

Kolhapur jaggery traders protest market shutdown
esakal
Kolhapur jaggery controversy : गुजरातमध्ये पाठवलेल्या कोल्हापुरी गुळामध्ये रासायनिक रंग आढळला. तेथील अन्न औषध प्रशासनाने दोन व्यापाऱ्यांवर कारवाई केली याचे पडसाद म्हणून आज शाहू मार्केट यार्डातील गूळ सौद्यात गूळ खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे तीन तास गूळ सौदे थांबले होते. शेतकरी व व्यापारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दुपारी बाराला गूळ सौदे सुरू झाले.