शेतकऱ्यांनो सावधाान - एप्रिलपासून रासायनिक खते महागणार ; असे असणार दर 

 Chemical fertilizers more expensive from April farm agriculture marathi news
Chemical fertilizers more expensive from April farm agriculture marathi news
Updated on

कुडित्रे (कोल्हापूर) : नवीन आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून रासायनिक खताचे दर गगनाला भिडण्याची शक्‍यता आहे. दरवाढीचे संकेत कंपन्यांनी विक्रेत्यांना दिले आहेत. यामुळे जिल्ह्यात डीएपी खत शॉर्ट झाले आहे. रासायनिक डीएपी खताचे दर प्रति पोते सुमारे 550 रुपये पर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. खरीप हंगामाचा विचार करता एक लाख 89 हजार टन खत जिल्ह्यासाठी लागते. खताची दर वाढ झाल्यास सुमारे 50 कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

सध्या उन्हाळी हंगाम संपत आला आहे. साखर कारखान्यांचा हंगाम संपले आहेत. ऊस भरणीचा हंगाम सुरू आहे. ऊस वाढीसाठी डीएपीमध्ये स्फुरदचे प्रमाण जास्त आहे. यामुळे डीएपी खताला मागणी वाढली आहे, मात्र डीएपी खाताचा तुटवटा झाला आहे. यामुळे शेतकरी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. डीपी खत मिळत नसल्याने हाथ मिश्रखत उत्पादन बंद झाले आहे. 

एका महिन्यात डीएपी खताचा दर चारवेळा वाढला आहे.तर 1330 वरून 1450 दर झाला. याबाबत खत कंपनी यांच्याशी संपर्क साधला असता उत्पादन खर्च वाढल्याने व शासनाकडून अनुदान न वाढल्यास दरवाढ होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. 
डीपी खताच्या पोत्याला 140 रुपयांवरून 550 रुपयेपर्यंत दर वाढ होण्याची शक्‍यता आहे. केंद्रशासन विद्राव्य खते सोडून खत कंपन्यांना अनुदान देते, उत्पादन खर्च वाढल्याने खताला अनुदान न वाढल्यास ही दरवाढ होणार आहे. 

शेतकऱ्यांना अच्छे दिन आले नाहीत , शेतकरी देशोधडीला लागला आहे, शासनाने खत दर वाढ करू नये. 
- कृष्णात पाटील, शेतकरी 

शासनाने अनुदान न वाढविल्यास खत दरवाढ होईल , डीएपी खताचा दर सुमारे 1700 रुपया पर्यंत जाईल. असा अंदाज आहे. 
- तानाजी निगडे व्यवस्थापक, रयत संघ. 

खत दर वाढ होण्याचे संकेत आहेत. पोत्याला 150 ते 200 रुपये वाढ होईल असा अंदाज आहे. 
- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com