
कुरुंदवाड : पंचगंगा नदीत आठवडाभरातच पुन्हा एकदा काळेकुट्ट रसायनमिश्रित पाणी आले असून, पाणी प्रदूषित झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या आठवड्यात माशांचा व जलचरांचा तडफडून मृत्यू झाला होता. आठवडाभरातच ही घटना पुन्हा घडल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके करते तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.