कोल्हापूर : क्रीडा संकुलमध्ये फ्लोटिंग स्टील टॅंक

६ कोटी खर्च; जलतरण तलावाचा प्रश्न मिटणार, मैदान विद्युतीकरण होणार
Chhatrapati Sambhaji Maharaj Divisional Sports Complex Floating steel tank kolhapur
Chhatrapati Sambhaji Maharaj Divisional Sports Complex Floating steel tank kolhapursakal

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावाच्या समस्येचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. तलावात फ्लोटिंग स्टील टॅंक (तरंगणारा) बसवण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटींचा खर्च होणार आहे.

क्रीडा संकुलाच्या कामांना उशिरा का होईना; पण सुरुवात होत आहे. दोन तलाव, डायविंग प्लॅटफॉर्म, बैठक व्यवस्था अशी रचना असणाऱ्या या ठिकाणी परिसरातील पाण्याचे उमाळे फुटल्याने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या तलावात पक्षी जलविहार करत होते. सध्या या तलावात स्टीलचा फ्लोटिंग टॅंक बनवण्यात येणार आहे. उमाळ्यातून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

येथील मुख्य मैदानाचा वापर वाढला आहे. फुटबॉलसह मैदानी खेळांचा सराव होत आहे. मुख्य मैदानावर विद्युतीकरण, मोकळ्या जागेत मल्टिस्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स बनवण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची मागणी केली असून, ती मंजूर झाली आहे. एकूण १२ खांब असून एलईडी अधिक प्रकाश देणारे दिवे लावण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे कमी प्रकाशात अथवा अंधारातही सराव करणे शक्य होणार आहे. संकुलाच्या आवारातील मोकळ्या जागेत मल्टिस्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स बनवण्यात येणार आहे. ज्यात ६ बॅडमिंटन कोर्ट, विविध मार्शल आर्टस्, टेबल टेनिससह अन्य इनडोअर खेळांच्या सरावासह राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेणे शक्य होणार आहे. या संकुलात बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, शॉवर रूम, स्टोअर सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

असा असेल स्टील टॅंक

  • ३ ते ५ इंच जाडीचा हा टॅंक

  • आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनविण्यात येणार

  • बंगळूर व पुणे येथील तज्ज्ञ समितीने भेट देऊन निरीक्षणे नोंदवली

  • सध्याच्या तलावात येणाऱ्या उमाळ्यांचा होणार निचरा

संकुलातील त्रुटी दूर करून अद्ययावत सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने काम सुरू केले आहे. संपूर्ण संकुल राष्ट्रीय मानकांच्या सुविधांनी सज्ज करून खेळाडूंना संकुल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com