Kolhapur News : चिक्कोडीचे मुख्याधिकारी डॉ. रोगी यांची बदली; बी. एम. माने यांची नियुक्ती

चिक्कोडी नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. एस. आर. रोगी यांची हल्याळ (जि. उत्तर कर्नाटक) नगरपरिषदेवर बदली झाली आहे.
Dr. S. R. Rogi
Dr. S. R. RogiSakal
Summary

चिक्कोडी नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. एस. आर. रोगी यांची हल्याळ (जि. उत्तर कर्नाटक) नगरपरिषदेवर बदली झाली आहे.

चिक्कोडी - नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. एस. आर. रोगी यांची हल्याळ (जि. उत्तर कर्नाटक) नगरपरिषदेवर बदली झाली आहे. त्यांच्या जागी चिक्कोडीचे नवे मुख्याधिकारी म्हणून बी. एम. माने यांची नियुक्ती करण्याचे आदेश नगरप्रशासन खात्याने बजावले आहेत. दरम्यान, बुधवारी संध्याकाळपर्यंत नव्या मुख्याधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारलेला नव्हता.

चिक्कोडी पालिकेत डॉ. रोगी अडीच वर्षे मुख्याधिकारी म्हणून राहिले. मे महिन्यात डॉ. रोगी यांची बदली झाली होती. त्यावेळी नवे मुख्याधिकारी आनंद केसरगोप्प यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी पाच दिवसांत पुन्हा डॉ. रोगी यांची फेरनियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी केसरगोप्प यांनी पदभार स्वीकारून काम सुरू केले असताना त्यांना पुन्हा येथून बदलीने जावे लागले होते.

बी. एम. माने हे सध्या खानापूर नगरपालिकेत कार्यरत आहेत. बदलीचे आदेश प्राप्त झाले असले तरी तेथील पदभार सोडून नवीन पदभार घेण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून चिक्कोडीत नवे मुख्याधिकारी रूजू होणार आहेत. यापूर्वी चिक्कोडीत दोनवेळा बदली रद्द झाली होती. डॉ. रोगी यांची जिल्हयाबाहेर बदली झाली आहे. तर माने यांची जिल्ह्यात बदली झाली आहे.

चिक्कोडी पालिकेत राजकीय रंग सुरू झाल्याचे अलीकडील काही घटनांवरून पुढे येत होते. त्यातूनच ही बदली झाली की निवडणुकीमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत, याची चर्चा सुरू आहे. शहरातील एका दुकानाचे अतिक्रमण हटविण्यावरून पालिका अधिकारी व आमदार यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यातूनच ही बदली झाली आहे का, अशीही चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com