

कागल येथील उरुसात जायंट व्हील अचानक बंद पडल्याने नागरिक पाळण्यात अडकले. तब्बल दोन तास बचावकार्य सुरू राहिले
esakal
Kagal Gaibipir Urus (नरेंद्र बोते) : कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसात शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकाराने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उरुसातील बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायंट व्हील पाळण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पाळणा बंद पडला आणि त्यात बसलेले नागरिक तब्बल दोन तास अडकून राहिले. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
उरुसात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याने काही काळ भीती आणि गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांनी तत्काळ पोलिस दलासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच उरूस कमिटीचे सदस्यही तातडीने मदतीला पोहोचले.