कोल्हापूरकरांनो वाहतूक नियम मोडणे पडणार महागात....

city traffic police now take punitive action against those violating traffic rules
city traffic police now take punitive action against those violating traffic rules

कोल्हापूर : वारंवार सांगूनही सुधारणा होत नसल्याने शहर वाहतूक पोलिसांनी आता वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांकडून एका महिन्यात तब्बल ३८ लाख रुपये दंडाची कारवाई केली. 


लॉकडाउन काळात रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. अशी पाच हजारांहून अधिक वाहने पोलिसांनी थेट जप्त केली. पण लॉकडाउन काळात नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही वाहने प्रत्येकी फक्त ३०० रुपये भरून घेऊन संबंधितांच्या ताब्यात देण्यात आली. लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल झाला.

रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढू लागली. वाहतूक नियमांचा भंग करण्याचे प्रकारही वाढू लागले. प्रारंभी प्रबोधन केले. पण जसजशी शिथिलता वाढत गेली तसा शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आढावा बैठकीत कारवाईच्या सूचना दिल्या. तसे वाहतुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने आवश्‍यक 
पावले उचलण्यास वाहतूक शाखेने सुरवात केली. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर आता कारवाई शिवाय गत्यंतर नसल्याने वाहतूक शाखेने ही मोहीम १ जून पासून हाती घेतली. 

अचानक तपासणी
विना परवाना वाहन चालविणे, एकेरी मार्गाचे उल्लंघन करणे, सिग्नल तोडणे, बेशीस्त पार्किंग असे वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली. शहरातील सिग्नल व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली. अचानक वाहनांची तपासणीची मोहीम राबविण्यात आली. यात नियमांचा भंग करणाऱ्या तब्बल १८ हजाराहून अधिक वाहन चालकांवर एक महिन्यात पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्यावर ३८ लाख रुपये दंडाची कारवाई केली. 

१ जून ते ६ जुलैअखेर कारवाई 


 १८ हजार २१४ वाहनचालकांना दंड
 १८ लाख ४० हजारांची वसुली
 २३ लाखांचा दंड येणे बाकी
दृष्टिक्षेपात शहर वाहतूक शाखा ः 
 शहरातील सिग्नल - २४
 नव्याने होत असलेले सिग्नल - १०
 क्रेन संख्या - ३
 शहर वाहतूक पोलिस कर्मचारी संख्या - १०६
 उपलब्ध मनुष्यबळ - ७५ ते ८०

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार आहे. 
- वसंत बाबर, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com