Sangli Politics : जयंतराव पिलावळ आवरा, आम्ही सभाच रद्द करतो; चंद्रकांत पाटील, जयंत पाटील यांच्यात वादाची ठिणगी

Jayant Patil ‘जयंतरावांचे वडील राजारामबापू यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. गोपीचंदचे वक्तव्य आम्हालाही मान्य नाही. ही भाषा महाराष्‍ट्राच्या नव्हे, तर मानवी संस्कृतीत बसणारी नाही.
Sangli Politics

Sangli Politics

esakal

Updated on
Summary

इशारा सभेचा उद्देश

स्टेशन चौकातील ‘जयंतराव बचाव’ सभेला उत्तर म्हणून भाजपची १ ऑक्टोबरला इशारा सभा होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नेत्यांवरील चिखलफेक व सभ्य राजकारण

पाटील यांनी सांगितले की बोलण्याची पातळी घसरली आहे; वीस प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन राजकीय संस्कृतीचे नियम ठरवावेत अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

जमिनीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया

जयंत पाटील यांनी काढलेल्या साडेतीनशे कोटींच्या जमिनीच्या विषयावर पाटील म्हणाले की त्यात तथ्य नाही; ऑनलाइन लॉटरी व मार्केट कमिटीच्या विषयावर आम्ही बोलल्यावर तुम्ही अस्वस्थ होताय का?

Chandrakant Patil Vs Jayant Patil : स्टेशन चौकातील ‘जयंतराव बचाव’ सभेला उत्तर देण्यासाठीच इशारा सभा होत आहे. आम्ही आमच्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. तुमची पिलावळ शांत करणार नसाल, तर आम्हीही स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला हा वाद वाढवायचा नसेल तर पुढे या, हा विषय संपल्याचे जाहीर करा. आम्ही सभा रद्द करतो, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

कालच मंत्री पाटील यांनी सांगलीत १ ऑक्टोबरला महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेला प्रत्युत्तरादाखल भाजपतर्फे इशारा सभा होणार असल्याचे जाहीर केले होते. आज सांगलीत महापालिकेत आढावा बैठकीसाठी आले असता, त्यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करताना जयंत पाटील यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘जयंतरावांचे वडील राजारामबापू यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com