
राधानगरीचे सात स्वयंचलित दरवाजे खुले गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी
राधानगरी, तुळशी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, घटप्रभा, धामणी धरण क्षेत्रांत अतिवृष्टी
पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात सहा फूट वाढ, सर्वच धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग
जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट, आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
Kolhapur Weather Alert : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. गगनबावडा तालुक्यासह राधानगरी, तुळशी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, घटप्रभा, धामणी धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे राधानगरी धरणाचे ७ स्वयंचलित दरवाजे खुले होऊन ११ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दरम्यान आणखी दोन दिवस पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.