
कोल्हापूर : ‘सर्किट बेंचच्या नूतन इमारतीसाठी शेंडापार्क येथील जागा केवळ हस्तांतर करून आम्ही थांबणार नाही, तर लवकरात लवकर आराखडा तयार करून सर्किट बेंचच्या इमारतीचे बांधकाम सुरू करू. कोल्हापुरात केवळ उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झालेले नाही, तर कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे दालन उघडले आहे. कोल्हापूर सेंट्रल स्टेजवर आले आहे. यामुळे आजूबाजूचे जिल्हे जोडले जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जे जे देता येईल, ते देण्याची सरकारची तयारी आहे’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.