"शासनाने ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. जमीन देण्याला ग्रामस्थांचा विरोध होता, तो डावलून चुकीच्या पद्धतीने जमिनीची मोजणी केली आहे."
कोवाड : दुंडगे (ता. चंदगड) येथे महसूल विभागाने (Revenue Department) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत (CM Solar Agricultural Channel Scheme) सौर प्रकल्पासाठी (Solar Project) पोलिस बंदोबस्तात गायरान जमिनीची मोजणी करून १६ हेक्टर जमिनीची कब्जेपट्टी केली. या प्रकल्पाला जमीन देण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध होता. मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याना ग्रामस्थांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.