
सागर चौगले
माजगाव : पन्हाळा तालुक्यात मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व वादळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली होती. मका, सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन आणि उन्हाळी भात आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे ८८४४.७७ एकर क्षेत्रावरील पिकांना अवेळी पावसाचा फटका बसला आहे. या आपत्तीमुळे सुमारे ३३४० शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.