कोव्हिड हेल्थसाठी दानशुरांनी पुढे यावे : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Collector Daulat Desai Appeal Donors fo Covid Health
Collector Daulat Desai Appeal Donors fo Covid Health
Updated on

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ आणि संजय घोडावत विद्यापीठ या ठिकाणी प्रत्येकी 500 खाटांचे कोव्हिड केअर आणि कोव्हिड हेल्थ रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणासह विविध मदतीची गरज आहे. जिल्ह्यातील दानशुरांनी पुढे येवून https://kolhapuriwarriors.com या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

कोव्हिड- 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्याकरता जिल्हा प्रशासनामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. येथील शिवाजी विद्यापीठ आणि संजय घोडावत विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 500 खाटांचे कोव्हिड केअर आणि कोव्हिड हेल्थ रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. या रुग्णालयासाठी वैद्यकीय व्यावसायिक, पॅरामेडीकल, वॉर्डबॉय, परिचारिका, फार्माशिस्ट, आरोग्य सेवक, वैद्यकीय उपकरणे, दवाखान्यात लागणारे इतर साहित्य, विविध प्रकारच्या सेवा, संगणक, तांत्रिक सेवा, अशा विविध प्रकारच्या सेवा आणि वस्तुंची रुग्णालयासाठी आवश्‍यकता आहे. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्थांनी पुढे येवून मदत करावी. ही मदत वैयक्तिक किंवा संस्थेच्या माध्यमातून ज्यांना द्यायची आहे, अशांनी https://kolhapuriwarriors.com या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com