esakal | हलगर्जीपण करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा बालरोग तज्ज्ञांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

हलगर्जीपण करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई

हलगर्जीपण करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तिसऱ्या लाटेचा (Covid 19 Third Wave) मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल्सनी सज्ज रहावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल्सनी फॅसिलिटी ॲप दैनंदिन मेंन्टेन(अद्ययावत) करावा, याकामी हलगर्जीपण करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई (Collector Daulat Desai)यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी झालेल्या बालरोग तज्ज्ञांच्या (Pediatrician)व्ही.सी द्वारे झालेल्या बैठकीत त्यांना ही इशारा दिला. (Collector-Daulat-Desai-warn-all-Pediatrician-for-Covid-19-Third-Wave-kolhapur)

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले,‘‘ जिल्ह्यात ऑक्सीजन पुरेसा साठा आहे. तरीही जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ हॉस्पीटल तसेच याकामी ज्या हॉस्पीटलची सेवा घेण्यात येणार आहे, त्या हॉस्पीटलनी प्रत्येकी 10 लिटरचे 5 ते 10 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर घेवून ठेवावेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही. भविष्यातील संभाव्य स्थिती लक्षात घेवून केवळ बालरोग तज्ज्ञांनीच व इतर रूग्णालयांनीही कोविड बाल रूग्ण उपचार देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे. याबाबत संबंधित रूग्णांलयानी मायक्रोप्लॅनिंग करावे़'‘

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले,की जिल्ह्यात किमान 1 हजार बेडची तयारी करावी लागेल. त्याचबरोबर साधे आणि ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी लागेल. त्याचबरोबर तालुकानिहाय बेडची उपलब्धता करावी लागेल. आयसोलेशन, होम केअर करताना रूग्णांची अतिशय काळजी घ्यावी लागेल. तसेच या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी सुमारे 190 आयसीयू बेड लागतील.

हेही वाचा- मराठा आरक्षणासाठी पुन्हा आर-पारची लढाई; शुक्रवारी शिवाजी चौकात धरणे आंदोलन

सध्या जिल्ह्यातील ‘ओटू़ बेडचा आपण आढावा घेतला असल्याची माहिती सीपीआर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संगिता कुंभोजकर यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगश साळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पोळ आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील इतर मान्यवर बालरोग्य तज्ज्ञ व्ही सीत सहभागी झाले होते.