-गौरव डोंगरे
कोल्हापूर : आर्किटेक्ट (Architect) होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याचे शिक्षण सुरू होते... मित्रांसोबत रेसिंगची त्याची हौसही जपली.... कुटुंबीयांचा लाडका असल्याने वर्षभरापूर्वीच नवी स्पोर्टस् बाईक घेतली...पण, आंबोलीहून परतताना ‘वेगाने’ या उमद्या तरुणाचा जीव घेतला. सिद्धेश विलास रेडेकर (वय २३, रा. माळी, कॉलनी टाकाळा) असे या तरुणाचे नाव. आजऱ्यातील माद्याळनजीक (Sankeshwar-Banda Highway Accident) त्याच्या स्पोर्टस् बाईकची मोटारीसोबत धडक होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला या घटनेने मोठा धक्का बसला.