दिलासादायक ः महापालिका करणार घरी जाऊन कोरोना रुग्णांवर उपचार

Comfortable: Municipal Corporation will go home and treat Corona patients
Comfortable: Municipal Corporation will go home and treat Corona patients

कोल्हापूर ः कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये हाउसफुल्ल झाल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने आता सामान्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात अशा सुमारे 333 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 
शहरात महापालिकेचे डॉक्‍टर्स तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्‍टर्स जाऊन अशा रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल आणि रुग्णांनाही घरच्या घरी उपचार करणे सोयीचे होणार आहे. ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची गरज आहे, अशा रुग्णांनाच दवाखान्यात उपचार केला जाणार आहे. 
शहरातील दवाखाने आता हाउसफुल्ल झाले आहेत. पैसा असणाऱ्या रुग्णांनाही हॉस्पिटल मिळेना झाले आहे. गरीब रुग्णांची स्थिती तर भयावह आहे. रुग्णालयाच्या दारातून उपचाराविना रुग्णांना परत फिरण्याची वेळ येत आहे, अशा स्थितीत प्रशासकीय यंत्रणा विविध उपाययोजना करत आहे. त्यातूनच कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार ही सुविधा केली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेचे डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरु आहे. आयुक्त डॉ. कलशेट्टी, सहायक आयुक्त चेतन कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू केली आहे. 

अशी होणार रुूग्णांवर उपचारासाठी देखरेख

शहरामध्ये लक्षणे नसलेने 205 पाझिटिव्ह कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. यामध्ये ऍस्टर आधार यांच्या देखरेखेखाली 10 व हॉटेलमध्ये 52, साई कार्डीयाक सेंटर देखरेखेखाली 5 व हॉटेलमध्ये 3, अथायू हॉस्पिटल देखरेखेखाली 3, सिध्दिविनायक हॉस्पिटल देखरेखेखाली 2 व हॉटेलमध्ये 7, डायमंड हॉस्पिटल देखरेखीखाली 12 व हॉटेलमध्ये 13 तसेच सावित्रीबाई फुले हॉस्पिटलअंतर्गत डॉक्‍टर डॉ. रुक्‍सार मोमीन यांच्या देखरेखेखाली 28, आयसोलेशन हॉस्पिटलअंतर्गत डॉ. अर्पिता खैरमोडे यांच्या देखरेखेखाली 18, महाडिक माळ नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत डॉ. रवी अभिवंत यांच्या देखरेखेखाली 2, फुलेवाडी नागरी आरोग्य सुविधा केंद्राअंतर्गत डॉ. सुनील नाळे यांच्या देखरेखेखाली 16, पंचगंगा हॉस्पिटल नागरी आरोग्य सुविधा केंद्राअंतर्गत डॉ. रुपाली यादव यांच्या देखरेखेखाली 16, फिरंगाई हॉस्पिटल नागरी आरोग्य केंद्रअंतर्गत डॉ. योगीता भिसे यांच्या देखरेखेखाली 13, कसबा बावडा नागरी आरोग्य सुविधा केंद्रअंतर्गत डॉ. बाळासाहेब पुडींकर 19, सिध्दार्थनगर नागरी आरोग्य सुविधा केंद्रअंतर्गत डॉ. विश्‍वनाथ खैरमोडे 4 व राजारामपुरी नागरी आरोग्य सुविधा केंद्रअंतर्गत यांच्या देखरेखेखाली डॉ. शोभा दाभाडे 27 रुग्ण घरी उपचार घेत आहेत. 
 

घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या : 333 
शहरातील रुग्णांची संख्या : 205 
ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या : 128 

-संपादन ः यशवंत केसरकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com