esakal | कोल्हापुरकरांना दिलासा! पुढील 3 आठवड्यात रुग्णसंख्या नियंत्रणात
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरकरांना दिलासा! पुढील 3 आठवड्यात रुग्णसंख्या नियंत्रणात

कोल्हापुरकरांना दिलासा! पुढील 3 आठवड्यात रुग्णसंख्या नियंत्रणात

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची (kolhapur district) वाढती संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी सीपीआर (CPR) रूग्णालयाकडून शक्य ते सर्व प्रयत्न सुरु आहेत. अन्य आरोग्य यंत्रणांच्या सामुदायिक प्रयत्नांची साथ आहे. त्यामुळे येत्या तीन आठवड्यात कोरोना (covid-19) नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली. आज झालेल्या बैठकीत सीपीआर रूग्णालयाच्या वतीने केंद्रीय समितीला ही माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या व मृत्यूचा दर अजुनही चिंताजनक आहे याची दखल घेत केंद्र सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील (western maharashtra) कोरोना आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती पाठवली होती. त्यानुसार राज्य निरिक्षक प्रदीप आवटे, आरोग्या कुटंब कल्यान विभागाचे संचालक डॉ. अनिल कांबळे, एम्स रूग्णालयाचे डॉ. सत्यजीत साहू यांच्या समीतीने सीपीआरला भेट दिली. कोरोना उपचार सेवेचा आढाव घेतला. त्यांची माहिती डॉ. मोरे यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा: केंद्रीय पथकाकडून महापालिकेच्या संजीवनी अभियानाचे कौतुक

यावेळी ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाटेच्या सुरवातीला अमरावती, मुंबई, पुणे सह राज्यातील अन्य जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. त्यानंतर जवळपास दीड-दोन महिन्यानंतर कोल्हापुरात कोरोनाची संख्या वाढू लागली. सध्या राज्याच्या अन्य जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला. त्यापाठोपाठ कोल्हापूरातील कोरोनाही नियंत्रणात येईल. आयसीएमआरआय सुचनेनुसार येथे उपचार होतात. त्याबाबत समितीने समाधान व्यक्त केले.

अनेक रूग्ण सुरवातीला लक्षणे अंगावर काढुन प्रकृती गंभीर झाल्यानंतर उपचाराला येतात. यात व्याधीग्रस्तांची संख्या जास्त आहे. व्याधीग्रस्तांना अत्यवस्थ स्थितीत सीपीआर रूग्णालयात उपचाराला पाठवले जाते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. ही बाब समीतीच्या निदशर्नास आणली आहे. यावरील उपाय म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयातील उपचार सुविधा सक्षम करणे, खासगी रूग्णालयांशी परस्पर संवाद संर्पक वाढविण्यावर भर द्यावा अशा सुचना समितीने जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्या असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा: पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य - केंद्रीय समिती

वाढीव चाचण्या लाभदायी

वाढीव चाचण्यामुळे कोरोनाबाधितांना वेळीच शोधता येत आहे. राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ सर्वाधिक चाचण्या कोल्हापुरात झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार करता येणे शक्य होत असल्याची बाब समितीला पटवून देण्यात आली. त्याबाबत समितीने समाधान व्यक्त केल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.

समिती आली... गेली

केंद्रीय समिती सीपीआरमध्ये पहाणीसाठी येणार म्हणून येथे सीपीआर परिसरातील सर्व रूग्ण नातेवाईकांना आवारा बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दुपारनंतर या परिसरात शुकशुकाट होता अशात समिती आली. थेट अधिष्टाता कार्यालयात गेली. तेथील डॉक्टरांसोबत बैठक घेतली व समिती आल्या पावली निघून गेली कोणत्याही वॉर्डाला भेट दिली नाही किंवा कोणत्याही रूग्ण नातेवाईकांशी संवाद साधला नाही. फक्त कागदोपत्री तपशील बघून समिती माघारी परतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

loading image