esakal | केंद्रीय पथकाकडून महापालिकेच्या संजीवनी अभियानाचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय पथकाकडून महापालिकेच्या संजीवनी अभियानाचे कौतुक

केंद्रीय पथकाकडून महापालिकेच्या संजीवनी अभियानाचे कौतुक

sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर : कोरोना महामारीचा (covid-19) फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी (१५) दुपारी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या लसीकरणाची (covid -19 vaccination) माहिती घेतली. सोबत लसीकरण कशा पद्धतीने सुरु आहे याची पाहणी केली. पाहणीनंतर महापालिकेच्या लसीकरण कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान शहराला जास्तीत जास्त व्हॅक्सीन उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी उप-आयुक्त निखील मोरे यांनी केली. या केंद्रीय (central health committee) पथकामध्ये राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, उप-संचालक डॉ. प्रणिल कांबळे, उरोरोग तज्ञ सहा. प्राध्यापक डॉ. सत्यजित साहू, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. हेमंत खरणारे उपस्थितीत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महानगरपालिकेने केलेल्या कामकाजाचे प्रेझेंटेशनद्वारे पथकाला माहिती दिली. महापालिकेने शहरामध्ये राबवलेल्या संजीवनी अभियानते केंद्रीय पथकाने कौतुक केले. महापालिकेने चांगले काम केले असून त्याची राज्यपातळीवर दखल घेतली आहे. संजीवनी अभियान राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे यावेळी समितीने स्पष्ट केले.

हेही वाचा: पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य - केंद्रीय समिती

दरम्यान दुपारी पथकाने सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. उप-आयुक्त निखील मोरे यांनी महापालिकेच्यावतीने लसीकरणावेळी देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. महापालिकेचे लसीकरणाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असून याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शहराची दैनदिन 6000 लसीकरण करण्याची क्षमता असल्याचे उप-आयुक्तांनी पथकाला सांगितली. जिल्ह्यासह शहराला व्हॅक्सीन उपलब्ध करुन देण्याच्या विनंतीला पथकाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ फारुख देसाई, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ रुक्सार मोमीन, लसीकरण नोडल अधिकारी डॉ.अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नियम पाळा अन्यथा तिसरी लाट अटळ; आरोग्य सल्लागारांचे सूचक वक्तव्य

loading image