

Government Forms Committee
sakal
कुडित्रे : मुदतीत ई-पीक पाहणी नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२५ हा १ ऑगस्ट, २०२५ पासून सुरू झाला होता. त्याअंतर्गत १ ऑगस्ट २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच १ ऑक्टोबर, २०२५ पासून सहायक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी केली होती.