Kolhapur Election : रुसू नका, नाराज होऊ नका; ताकदीने लढून महापालिका जिंकू – सतेज पाटील यांचे भावनिक आवाहन
Congress prepares for Kolhapur civic elections : महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात ताकदीने लढण्याचे आवाहन सतेज पाटील यांनी केले,११ ते २० प्रभागांसाठी १९४ इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण; पक्षाचा निर्णय अंतिम मान्य करण्याचा सर्वांचा निर्धार.
कोल्हापूर : कसबा बावडा, लाईन बाजार हा आपला बालेकिल्ला आहे. तो अबाधित राहिला पाहिजे. याशिवाय, शहरातील प्रत्येक प्रभागात आपण ताकदीने लढून महापालिका जिंकू, तुम्ही कोणीही रुसू नका.