
Kolhapur Politics : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) मंजूर झालेल्या कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने हमी द्यावी, या मागणीसाठी गेलेल्या राहुल पाटील यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कर्जासह इतर विकासकामांना गती देण्यासाठी राहुल पाटील हे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत जातील, असे चित्र आहे.