Kolhapur Politics : जे चांगलं आहे, त्याला निश्‍चित पाठिंबा दिला जाईल पण..; राजाराम कारखान्याबाबत काय म्हणाले सतेज पाटील?

१२०० सभासद अपात्र झाले, तोच पोटनियम नव्याने आणला जात आहे.
Amal Mahadik vs Satej Patil
Amal Mahadik vs Satej Patilesakal
Summary

लोकांना वार्षिक सभेला येण्यासाठी वेळ लागतो. यासाठी सभेची वेळ सकाळी ११ ऐवजी दुपारी १ ची केली पाहिजे.

कोल्हापूर : बनावट १२०० सभासद अपात्र झाल्याने पोटनियम बदलण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर राजाराम कारखाना (Rajaram Sugar Factory) खासगी करून घेण्याचा ठराव मंजूर करून घ्यावा, पोटनियमातील बदल पाहता कारखाना खासगीकरणाकडे वाटचाल करत असल्याची टीका आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली.

Amal Mahadik vs Satej Patil
संतापजनक! पोलिसानं स्वतःच्या चार महिन्याच्या बाळाला रस्त्यावर आपटलं; क्षणात चिमुरड्याचा जागीच दुर्दैवी अंत, असं काय घडलं?

महापालिकेतील एका कार्यक्रमात आमदार पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आमदार पाटील म्हणाले, ‘कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे सहा तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. शाहूवाडीपासून राधानगरी तालुक्यातील चांदे-कोते पर्यंतचे कार्यक्षेत्र आहे. लोकांना वार्षिक सभेला येण्यासाठी वेळ लागतो. यासाठी सभेची वेळ सकाळी ११ ऐवजी दुपारी १ ची केली पाहिजे.

Amal Mahadik vs Satej Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंचं मोठं विधान; म्हणाले, 'मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय पुढं..'

तसेच, कारखान्याच्या पोटनियमात अनेक बदल केले जात आहेत. १२०० सभासद अपात्र झाले, तोच पोटनियम नव्याने आणला जात आहे. त्यामुळे भाड्याने जमीन दिली तरी सभासद होता येते. पोटनियमातील बदल पाहिले, तर हा कारखाना खासगीकरणाकडे वाटचाल करत आहे. सहकारातील कारखाना वाचला पाहिजे. जे चांगले आहे त्याला निश्‍चित पाठिंबा दिला जाईल, असेही पाटील यांनी सांगितलं.

Amal Mahadik vs Satej Patil
Dhangar Reservation : ..तर महाराष्ट्रातसुद्धा जाट आंदोलनासारखं धनगर समाजाचं आंदोलन उभा होईल; पडळकरांचा सरकारलाच इशारा

अनेक गावांमध्ये गेल्या निवडणुकीत आम्हाला मतदान मिळाले, त्यांचे ऊस पुरवठ्याचे करार करुन घेतले जात नाहीत. दुसरीकडे उसाचा तुटवडा असल्याने कोणत्याही गावातील कितीही ऊस आणला तरीही चालतो. मात्र, सत्ताधाऱ्यांना उसापेक्षा सांगली जिल्ह्यातील १२ गावे कार्यक्षेत्रात घेऊन त्यांना सभासद करून घ्यायचे आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com