"मूर्तीमध्ये कुठलाही बदल करणे म्हणजे विटंबना असते. त्यामुळे सध्या होणाऱ्या संवर्धनामध्ये १९३७ मध्ये ज्या पद्धतीने मूर्ती होती त्याच पद्धतीने संवर्धन करावे लागणार आहे."
जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र वाडी रत्नागीरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा, कोल्हापूर) येथील जोतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया आज (ता. २१) सकाळपासून सुरू होत आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पुरातत्त्व विभागाचे (Archaeology Department) पथक डोंगरावर (Jyotiba Dongar) दाखल झाले आहे.