
-संतोष मिठारी
कोल्हापूर : महारेरा (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण)कडून दाखविण्यात येणाऱ्या त्रुटींची पूर्तता करून नोंदणी प्रमाणपत्र मिळविताना बांधकाम व्यावसायिकांची दमछाक होत आहे. त्यातही एकाचवेळी त्रुटींची माहिती मिळत नसल्याने अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे नोंदणी प्रमाणपत्रासाठी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत असून, त्याचा व्यवसायाला फटका बसत आहे, अशी तक्रार व्यावसायिकांतून होत आहे.