Container fire: 'करुळ घाटात कंटेनरला आग; दोन तास वाहतूक ठप्प'; काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण
Kolhapur News : करुळ घाटात कोल्हापूरच्या दिशेने जाताना एका वळणावर चालकाला केबिनजवळून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. कंटेनर थांबवून पाहत असताना काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले. चालकाने वैभववाडी पोलिसांशी संपर्क साधला.
Massive fire in container at Karul Ghat disrupts traffic for hours; emergency response underway.Sakal
गगनबावडा : करुळ घाटातून डोझर मशीन घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरची केबिन जळून खाक झाली. कंटेनर चालक बचावला आहे. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.