इचलकरंजीत दूषित पाणी पुरवठा

Contaminated Water Supply In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Contaminated Water Supply In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Updated on: 

इचलकरंजी : येथील सातपुते गल्लीतील नळाला दूषित पाणी येत आहे. कामगार नेते सदा मलाबादे यांनी दूषित पाण्याची बाटली थेट नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या टेबलवर ठेवली. याबाबत तातडीने उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. 

येथील सातपुते गल्लीतील 10 ते 12 नळांना दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांसह मलाबादे यांनी ही बाब आज पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. बाटलीतून दूषित पाणी आणून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी देण्याची पालिकेची जबाबदारी असताना दूषित पाणी दिले जात असल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. 

याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना नगराध्यक्षा स्वामी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या. जलवाहिनीला गळती लागल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यामुळे गळती शोधून ती दूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी सांगितले. या वेळी जल अभियंता अंकिता मोहिते, शाखा अभियंता बाजी कांबळे उपस्थित होते. 

संपादन - ,सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com