
Harshal Patil Case: सांगली जिल्ह्यातल्या तांदुळवाडी इथं हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं गळफास घेतल्याच्या घटनेवरून आता राजकारण तापलं आहे. सरकारने कामाचे पैसे न दिल्यानं हर्षल पाटीलवर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप होत आहे. यावर आता राज्याच्या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जलजीवन मिशनचं कोणतंही काम हर्षल पाटील यांच्या नावावर नाहीय. तसंच कोणतंही बिल प्रलंबित नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.