
सार्वजनिक बांधकाम विभागासह ग्रामविकास, जलजीवन मिशन, जलसंधारण, जलसंपदा, विशेष निधी, जिल्हा नियोजन, आमदारांचा निधी यामधील कामे केलेल्या राज्यातील १५ हजारांहून अधिक कंत्राटदारांची सुमारे ८१ हजार कोटींची बिले सरकारने थकविली आहेत. त्यामुळे हे कंत्राटदार रस्त्यावर आले आहेत. दररोज देणेकरी दारात येत आहेत. त्यांना काहीच देऊ शकत नाही, अशी खंत त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे सर्व पर्याय संपल्यानंतर मनुष्य जो मार्ग अवलंबतो तो म्हणजे मृत्यूला कवटाळण्याचा. त्याची सुरुवात तांदुळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराच्या रूपाने झाली आहे. त्यांच्या व्यथा मांडणारी ही मालिका...