
शिवाजी यादव
कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या हिताच्या योजना शासन राबवत आहे. मात्र, त्याचा चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लाभासाठी वापरलेला कोट्यवधीचा निधी, तीन योजनांसाठी पुरवठादारांनी पुरवलेला माल व त्यासाठी लावलेल्या किमती याविषयी तक्रारी होऊनही त्या बेदखल झाल्या आहेत. त्यामुळे योजनांच्या स्वरूपाविषयी विविध कामगार संघटनांकडून शंका व्यक्त होत आहेत.