कोरोनाचे संकट धोक्‍याच्या पातळीवर ; प्रशासनाला कसावी लागणार कंबर

 Corona crisis at risk level; The administration will have to tighten its belt
Corona crisis at risk level; The administration will have to tighten its belt
Updated on

कोल्हापूर  : जिल्ह्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट घोंघावत आहे. एक महिन्यात व त्यातही मागील 15 दिवसांत रुग्णसंख्या सहा पटीने वाढली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सांगली, सातारा, बेळगाव या जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांचा कहर सुरू आहे. नियमांचे पालन न झाल्याने कोल्हापुरातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या वाढत असताना जिल्हा प्रशासन नेमकं करतंय काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाके बंद आहेत. गावागावांत जिल्ह्याबाहेरून व कोरोना हॉटस्पॉटमधून येणाऱ्या लोकांच्या नोंदी थांबल्या आहेत. कोविड सेंटर अपवादानेच सुरू आहेत. त्यामुळे नागरिक, प्रशासन, ग्रामपंचायतींनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्‍यता आहे. 


शेजारील जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होत असल्याने आता स्थलांतरासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात, शहरात व गावात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या नोंदी घेणे, आरोग्य तपासणी करणे, बाधित रुग्ण आढळला तर त्याच्यावर उपचार करणे, संपर्कातील व्यक्‍तींना अलगीकरणात ठेवणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तर ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे मात्र लक्षणे आढळत नाहीत, त्यांच्यासाठी विशेष मोहीम आरोग्य विभागालाच राबवावी लागणार आहे. सध्या तरी प्रत्येक तालुक्‍यात एक कोविड सेंटर करणे व उपचार करण्याचे नियोजन असले तरी वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाला आणखी नेटके नियोजन करावे लागणार आहे. 
 
एक हजार रुग्ण ओलांडले की, धोका 
कोरोनाची धोक्‍याची पातळी ही 10 दिवसांच्या रुग्णसंख्येवर ठरते. जर 10 दिवसांत कोरोनाचे 1000 रुग्ण म्हणजेच दिवसा 100 रुग्ण झाले तर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. अशा ठिकाणी कडक निर्बंधासह लॉकडाउनचा विचार करण्यात येतो. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे दररोज 80 ते 90 रुग्ण सापडत आहेत. दिवसा 100 रुग्ण सापडण्याच्या उंबरठ्यावर जिल्हा येऊन पोहोचला आहे. दररोज कोरोना रुग्णांचे शतक होऊ नये, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे तर प्रशासनाने कडक निर्बंध लादणे हाच पर्याय आहे. 

रुग्णवाढ आहे; पण धोका कमी 
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी पहिल्या लाटेसारखी परिस्थिती नाही. सध्या जिल्ह्यात 743 रुग्ण कोरोनावरचे उपचार घेत आहेत. यांतील 20 रुग्णांसाठी ऑक्‍सिजनचा वापर होत आहे, तर 4 रुग्णांसाठी व्हेंटिलेटर वापरले जात आहे. उपचार घेणारे बहुतांश रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

या उपाययोजनांची गरज 

*तपासणी नाके सुरू करण्याची गरज 
*गावागावांत नोंदींची आवश्‍यकता 
*कन्टेन्मेंट झोन प्रभावी राबवणे आवश्‍यक 
*कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग हवे अधिक प्रभावी 
*चाचण्यांची संख्याही वाढवावी लागणार 

कोरोना वाढेल तसे स्थलांतर वाढणार आहे. हे स्थलांतर कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे नाक्‍यानाक्‍यावर तपासणी करणे अशक्‍य आहे. म्हणूनच परराज्यातून, बाधित भागातून गावात, शहरात आलेल्या प्रत्येक व्यक्‍तीची नोंद घेणे आवश्‍यक आहे. आरोग्य विभागाने कन्टेन्मेंट झोनबाहेर कोरोना वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी याच्या सूचना दिल्या आहेत. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com