शेत - शिवार सुद्धा जेव्हा निवारा नाकारतं ; पासेपारधी समाजाची व्यथा

corona effect on fase pardhi community
corona effect on fase pardhi community
Updated on

चंदगड - जंगल, शेती -शिवार हेच त्यांच घर. जिथे रात्र होईल तिथेच विसावा घ्यायचा. परंतु आता हेच हक्काच घर त्यांना नाकारु लागलय. शेतकरी आपल्या हद्दीत थारा देत नाहीत. उघड्या माळरानावर गावकरी हटकतील याची भिती.  आठ - दहा जणांच कुटुंब सांभाळताना अक्षरशः तारेवरची कसरत. खायला अन्न नसल्याने उसाच्या पेरात सुध्दा वाटणी. तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील माळरानावर एका पासेपारधी कुटुंबाची ही विदारक स्थिती.

कोरोनाने संपूर्ण व्यावहारिक चित्रच बदलले आहे. संसर्गातून हा रोग होतो याची प्रत्येक मनाला भिती आहे. त्यामुळे एकमेकाकडे बघण्याची संशयी वृत्ती बळावली आहे. त्याची झळ भटक्या लोकांना भाजुन काढीत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात एक पासेपारधी कुटुंब रानोमाळ भटकत होत. त्यांना शेतकरी आपल्या शेतात थारा देत नव्हते. माळरानावर गावकरी थांबू देत नव्हते. डोकीवर छत नसल्याने हे कुटुंब झाडाखालीच आधार घेत तेऊरवाडीच्या हद्दीत पोहचले. कुटुंबात चार -पाच लहान मुले . खायला अन्न नसल्याने ऊस खावून दिवस काढीत असल्याचे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना समजले . त्यांनी त्यांचा शोध घेवून बैलगाडीतून धान्य पोहचवले . अटीतटीच्या वेळी झालेल्या या मदतीने त्या कुटुंबियांचे डोळे आनंदाने पाणावले. अन्नाची सोय झाली पण छ्ताची सोय कशी होणार ही विवंचना आहेच. सध्या अवकाळी पाऊस होत असल्याने धान्य भिजून खराब होऊ नये याची काळजी आहे.

भटक्यांवर माणुसकी दाखवा....

भटक्या समाजातील लोकांकडे संशयाने बघितले जाते . त्यांना नदी, विहिरीवर पाणी नाकारले जाते. गावात तर प्रवेशच नाही . परंतु ही वेळ कसोटीची आहे. सोशल डीस्टन्सींग ठेवून त्यांना अन्न -पाण्याची मदत करणे गरजेचे आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur child accident latest news
Government Employee Dies in Kolhapur Road Accident
Satej Patil Gokul Election Rajarshi Shahu Samvichari Aghadi
Shiv Sena UBT complaint against Rajesh Kshirsagar
Marathi News Esakal
www.esakal.com