विद्यार्थ्यांच्या आनंदावर कोरोनाचे सावट; महाविद्यालयांचा ट्रॅडिशनल डे सुनासुना

कोरोना निर्बंधात उत्साह अबाधित ठेवून महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे साजरे झाले
College Traditional Day
College Traditional Daysakal

इचलकरंजी : गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधात (corona restriction)उत्साह अबाधित ठेवून महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे (College Traditional Day)साजरे झाले.मात्र यंदा पहिल्यांदाच मकरसंक्रांतीला (Makar Sankranti)प्रत्येक महाविद्यालयात होणारे ट्रॅडिशनल डे थांबले आहेत. शाळा,महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहावर संक्रांत आली आहे.पारंपारिक वेशभूषेनी नटलेले,सजलेले आणि बहरणारे महाविद्यालयात कॅम्पस यावर्षी सुनेसुने वाटत आहेत.भारतीय विविधतेचे दर्शन घडवणारा ट्रॅडिशनल डे'(Traditional Day)ला विद्यार्थी मुकले.

College Traditional Day
नागपूर : मिठाईवरील ‘एक्स्पायरी डेट’ गायब

नव वर्षातील पहिला सण मकरसंक्रात हा महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असते. महाविद्यालयातील प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक विभागातील विद्यार्थी एकत्र येवून हा दिवस ट्रॅडिशनल डे म्हणून अमाप उत्साहात साजरा करतात.विविधरंगी पोषाखांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालय कँपसचे वातावरण एकदम सांस्कृतिक झालेले असते.पारंपरिक व्यक्तिरेखांसह धोती-कुर्ता, नऊवारी साडी, फेटा अशा विविध पोशाखांमध्ये युवक-युवतींनी कॉलेजला हजेरी लावतात.विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे या दिवशी महाविद्यालयात भारतीय संस्कृतीचे दर्शन होतेच,शिवाय संस्कृती जीवापाड जपली जाते.गेल्या दोन वर्षात कोरोनातून सावरत नियमांचे पालन करत महाविद्यालये सुरु असल्याने विद्यार्थ्यांना ट्रॅडिशनल डे चा आनंद लुटत परंपरा जपण्याचा प्रयत्न केला.

College Traditional Day
कोरोना होम टेस्टमध्ये 3549 पॉझिटिव्ह - किशोरी पेडणेकर

यंदा वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये लॉक झाली आहेत.त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच महाविद्यालयीन विद्यार्थी ट्रॅडिशनल डे साजरा करण्यापासून घरीच राहिले आहेत.कोरोनाने शैक्षणीक जीवन विस्कटले आहेच.त्याचबरोबर शिक्षणाच्या विविध टप्प्यावरील उत्साहही हिरावून घेतला आहे. मनोरंजन,सांस्कृतिक मेजवानी असणाऱ्या ट्रॅडिशनल डे बाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गप्पावर पाणी फिरले आहे.मकरसंक्रातीला सकाळपासून शहरासह महाविद्यालय परिसर विविधरंगी वेशभूषेने बहरलेला असतो.यावर्षी हे चित्र पूर्णतः उलटे असून महाविद्यालय ओस पडल्यासारखी दिसत आहेत.सामूहिक आनंदाला मुकत घरीच ट्रॅडिशनल डेच्या आठवणी विद्यार्थ्यांना यंदा जपाव्या लागल्या.

पोलिसांवरील ताण कमी

ट्रॅडिशनल डे ला टवाळखोर आणि हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसही फिरत असतात. पोलिसांना विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. मात्र महाविद्यालयेच बंद असल्याने पोलिसांवरील कामाचा ताण कमी झाला.यंदा मकरसंक्रांतीला विद्यार्थ्यांच्या उत्साहासह पोलिसांचे कामही कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com