esakal | कोल्हापुरात चार दिवसांत 1125 कोरोना रुग्ण

बोलून बातमी शोधा

null
कोल्हापुरात चार दिवसांत 1125 कोरोना रुग्ण
sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात 21 ते 25 एप्रिल या चार दिवसात 1267 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. शहराच्या प्रत्येक प्रभागात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहराच्यादुष्टीने ही चिंता वाढवणारी बाब आहे. महापालिका आणि जिल्हाप्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. कडक लॉकडाउन असतानाही वाढणारी रुग्णसंख्या सर्वांची डोकेदुखी ठरणार आहे.

कोल्हापुर शहरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. प्रभागनिहाय शहरात किती रुग्ण आहेत. याचीही आकडेवारी महानगरपालिकेने जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळावी, काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका, सरकारी रुग्णालयांवर ताण आहे. खासगीतील उपचार खर्च लोकांच्या आवाक्‍याबाहेर आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा: आता वाजवा! लग्नाची वरात पोहोचली डायरेक्ट पोलिस स्टेशनच्या दारात

  • शहरातील 21 ते 25 एप्रिल एकूण रुग्ण : 1267

  • निव्वळ कोल्हापूर शहरातील रुग्ण : 1125

  • इतर जिल्ह्यातील रुग्ण : 101

  • इतर राज्यातील रुग्ण : 41

शहरातील विभागीय कार्यालयानुसार आकडेवारी

  • विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान : 333

  • विभागीय कार्यालय क्रमांक 2 शिवाजी मार्केट : 293

  • विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपूरी : 236

  • विभागीय कार्यालय क्रमांक 4 ताराराणी मार्केट : 263