कोल्हापूर - 'त्या' कोरोनाबाधिताच्या पत्नीचा आणि मुलाचा अहवाल आला

corona report negative of kolhapur top corona patient
corona report negative of kolhapur top corona patient
Updated on

टोप (कोल्हापूर) : येथील कोरोना बाधित रूग्णाच्या पत्नी आणि मुलाचा कोरोना चाचणी अहवाल आज (सोमवार) निगेटिव्ह आला. त्यामुळे टोपवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

येथील महाडिक वसाहतमध्ये शुक्रवारी ( ता.१०) कोरोना रुग्ण सापडला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  


त्या कोरोना रुग्णास खूप दिवस त्रास होत असल्याने संपर्कात आलेल्या लोकांचे धाबे दणाणले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या ९ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच त्यांचे स्वॅब घेतले होते. यामुळे यातील किती लोकांना कोरोनाची लागण होणार याचीच चर्चा गावात सुरु होती. दरम्यान, आज त्या रुग्णाच्या पत्नी आणि मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. परंतु, अद्यापही काही जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण कायम आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kini Toll Plaza Traffic update
Sonam Maskar Silver Medal kolhapur
Maharashtra Weather Update
Maharashtra Sugar Season 2026
Marathi News Esakal
www.esakal.com