कोल्हापूरात शंभरला सहा कोंबड्यांचा आला सुपरसेल....

coronavirus impact on poultry industry kolhapur marathi news
coronavirus impact on poultry industry kolhapur marathi news
Updated on

सेनापती (कापशी कोल्हापूर) : सेल अनेक प्रकारचे पाहिले असतील; परंतु कोरोनामुळे  कोंबड्यांचाही सेल पाहावा लागला. सुरवातीला सेनापती कापशीत काल (ता. ९)च्या बाजारात दोनशे रुपयांना पाच अशा दराने कोंबड्या विकल्या; तर आज माद्याळ येथे चक्क शंभरला सहा अशा कोंबड्या विकण्यात आल्याने पोल्ट्रीधारक उद्‌ध्वस्त झाले आहेत.

लाऊडस्पीकर लावून कोंबड्यांचा सेल

काल सेनापती कापशीचा आठवडा बाजार. चिकन विक्रेते आणि पोल्ट्रीधारकांनी टेम्पो भरून कोंबड्या विक्रीसाठी आणल्या. येथे लाऊडस्पीकर लावून त्यांनी चक्क कोंबड्यांचा सेल मांडला. दोनशे रुपयांना पाच याप्रमाणे त्यांची विक्री करण्यात आली. त्यापुढे जाऊन आज माद्याळ येथे चंदगड येथून आलेल्या विक्रेत्याने उच्चांक करत शंभर रुपयांना सहा कोंबड्या विकल्या. नंद्याळ येथेही असे टेम्पो, ट्रक भरून विक्री सुरू राहिली.  

कोंबडी अन मास्क
’नशीब कधी बदलेल सांगता येत नाही, कोरोनामुळे २० रुपयांचा मास्क २०० रुपयाला आणि २०० रुपयाची कोंबडी २० रुपयाला झाली.’ असा मेसेज फिरू लागला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur football fans FIFA World Cup celebration
Kasba Beed gold coin discovery
Kolhapur Vehicle Entry Tax
Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com