दवाखान्याचे ठोठावले दरवाजे कोणीच केला नाही उपचार  ; शेवटी शेतकऱ्याला हाय खातच गमवावे लागले प्राण

Coronavirus impact in village not treatment the farmer is death in utture
Coronavirus impact in village not treatment the farmer is death in utture

उतूर ( कोल्हापूर) : आंबेओहळ प्रकल्पातीच्या लाभक्षेत्रात त्यांची दोन एकर जमीन संपादीत केली. त्यानी या जमीनीच्या बदल्यात दुस-या गटनंबर मधील दोन एकर जमीन देण्याचे कबूल केले. ज्या शेतक-याची जमीन प्रकल्पात बाधीत झाली होती त्यानी ही जमीन पसंद केली. तसा करारही झाला. यासाठी चार वर्षाचा कालावधी लोटला. शासनाकडून दोन एकर जमीन काढून घेतात  की काय असा धसका त्यानी मनात धरला.

या धसक्याने ते आजारी पडले. त्याना दवाखान्यात अॕडमीट करण्यासाठी कुटूंबाने परिसरातील अनेक दवाखान्याचे दरवाजे ठोठावले. मात्र कोरोनाच्या भितीने त्यांच्यावर कुणीही उपचार करण्यास पुढे आले नाही. माझी जमीन माझी जमीन म्हणतच त्यानी प्राण सोडले. त्या दुर्दैवी शेतक-याचे नाव आहे.शंकर सुबराव पाटील. या शेतक-याच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी आंबेओहळ धरणग्रस्थ संग्राम संघटनेने केली आहे.


आरदाळ (ता.आजरा) येथे पोवार परिवाराच्या नावावर सुमारे आठ एकर जमीन आहे. यातील  दोन एकर जमीन धरणग्रस्थ शेतक-याना देण्यासाठी संपादीत करण्यात आली. ही जमीन उतूर - आजरा रस्त्याशेजारी आहे. शिवाय पोवार यांच्या पुर्वज्यांना या ठिकाणी दफन केले आहे यामुळे  जमीनीशी त्यांचे भावनीक नाते तयार झाले होते. या जमीनीऐवजी मी दुस-या गट नंबर मधील दोन एकर जमीन देतो अशी विनंती पोवार यानी शासनाकडे केली. अनेक हेलपाटे,अर्ज विनंत्या केल्या.

पोवार यांची बदली जमीन घेण्याचे गावातील कै.भाऊ रावजी पाटील यांच्या वारसानी मान्य केले. पुनर्वसन विभागाचे उपजिल्हा अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली. याचा 7डिसेंबर 2016 ला आदेश काढण्यात आला. दोन वर्षानंतर 6 फेब्रुवारी 2018 ला पोवार यांच्याकडून प्रतीज्ञापत्र लिहून घेतले. मात्र अंतीम निर्णय झाला नाही. जमीन घेणारे तयार आहेत देणा-यांनी कागदपत्र पुर्ण केले आहेत. मग ताबा का दिला जात नाही असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहेत. शासन आपल्याकडून दोन ऐवजी चार एकर घेण्यासाठी  चालढकल करीत आसल्याची भावना पोवार यांच्या मनात तयार झाली. त्यांनी याचा धसकाच घेतला आणि त्यांचा 23 आॕगष्टला मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. 

अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे आंबेओहचे काम 20 वर्षे रखडले आहे.शंकर पोवार यांचा मृत्यू आपली 4 एकर जमीन जाण्याच्या कारणाने झाली आहे.याबाबत मुख्यमंत्र्याना निवेदन देवून आंदोलन करणार आहे.
शिवाजी गुरव - आंबेओहळ धरणग्रस्थ संग्राम संघटना.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com