कोरोना महामारीत कोल्हापुरातील 'या' रुग्णालयाने दिला मोठा आधार

covid 19 blood bank cpr hospital medical marathi news
covid 19 blood bank cpr hospital medical marathi news

कोल्हापूर : कोरोना महामारी काळात लॉकडाऊनचा फटका रक्तपेढ्यांना बसला. गेल्या वर्षात एप्रिल ते ऑक्टोंबर महिन्या दरम्यान रक्तसंकलनात मोठ्ठी घट झाली होती.परंतु कोरोना संसर्ग कमी होत असतानाच रक्त संकलनात वाढ होत आहे. 
गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. संकलित करण्यात आलेलं रक्त 35 दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतं, यामुळेच रक्तपेढीत पुरेसा साठा करणं आवश्यक असतं.या दृष्टीनेच या रुग्णालया च्या विभागीय रक्तपेढीने रक्त संकलनासाठी कोरोना काळात यशस्वी प्रयत्न केले.

रक्त संकलन करताना दात्यांची गर्दी टाळुन, रक्तदात्यांची 'ट्रॅव्हल हिस्ट्री' तपासली तपासुन,तसेच स्वच्छतेचे आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत जिल्हाभरात रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. रक्तपेढ्या आणि मोबाईल ब्लड बँक व्हॅन्समध्ये रक्तदानाची प्रक्रीया पार पडत आहे.कोरोनाच्या भीतीपोटी रक्तदात्यांनी सुरवातीच्या काळात रक्तदानाकडे पाठ फिरवली होती परंतु रक्तपेढी कडून प्रबोधन तसेच आवाहनाला साथ देते रक्तदाते परत रक्तदानाकडे वळले आहेत.रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी कोरोना प्रतिबंधक सूचनांचं पालन करून रक्तदान शिबिरे आयोजित होत आहेत.यासाठी सीपीआर रुग्णालयातील रक्तपेढी रक्तसंकनाची कसर सध्या भरुन काढत आहे.

वाढदिवस,जयंती उत्सव,विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने भरणारी रक्तदान शिबिरे कोरोना काळात बंद होती.यामुळे रक्तसंकलनाची सर्व भिस्त रक्तपेंढ्यांवर येऊन ठेपली.त्यामुळे रुग्णांसाठी रक्ताची गरज भागवण्यासाठी प्रशासनाच्या परवानगीने शिबिरे आयोजित करुन ही निकड पुर्ण केली जात आहे. रक्तपेढी कडून महिन्याला 1 हजार रक्त पिशव्या संकलांचे उद्दीष्ट ठेवले जाते परंतु कोरोना काळात सरासरी 200 ते 500 रक्त पिशव्या संकलित होत होत्या आता ही संख्या वाढत 960 पिशव्या पर्यत पोहचली आहे.रक्तदानास सर्वश्रेष्ट दान समजुन अधिक लोकांनी रक्तदानाकडे वळावे असे आवाहन सीपीआर रक्तपेढी कडून करण्यात येत आहे.

 थॅलेसिमिया,अप्लास्टिक एनीमिया यासारख्या आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेस दिले आहेत.याचा फायदा रुग्णांना होणार आहे.या आजारांवर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना सुद्धा मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे.यामुळे अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची गरज आहे.

पॉईंटर - 

1 ) वर्ष / रक्तसंकलनात
2019 - 12569 पिशव्या 
2020 - 8395 पिशव्या

2 ) रक्तपेढी कडून कोरोनाकाळात 120 प्लाझ्मा पिशव्यांची निर्मिती

3) जानेवारी महिन्यात जिल्हाभरात २१ रक्तदान शिबिरे तर  960 रक्त पिशव्यांचे संकलन 


कोरोना महामारीत ही सीपीआर रक्तपेढीने महत्त्वाची भूमिका बजावली.सध्या रक्तदात्यांची संख्या वाढत आहे.कोरोनाची भीती कमी झाल्याने रक्तदानास लोक येत आहे.त्यामुळे रक्तसंकलन चांगले आहे.

डॉ.रविंद्र रामटेके - रक्तपेढी प्रमुख,सीपीआर

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com