आता कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ थांबणार

covid 19 Medicine order given by the District Health Officer Dr. Yogesh Sali to the management of the hospitals
covid 19 Medicine order given by the District Health Officer Dr. Yogesh Sali to the management of the hospitals
Updated on

कोल्हापूर :  कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येणारे रेमिडेसिव्हर हे औषध खासगी दवाखान्यांनी आपल्या येथे उपलब्ध करून ते रुग्णाला द्यावे. जिल्हा औषध भांडारामध्ये हे औषध खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबते आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळी यांनी यांनी दवाखान्यांच्या व्यवस्थापनांना दिले आहेत. 


कोरोना रुग्णांना रेमिडेसिव्हर हे औषध दिले जाते. जिल्हा परिषदेच्या औषध भांडारामध्ये सध्या ते स्वस्त दरात उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र औषध घेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. रेमिडेसिव्हर हे औषध स्वस्त दरात स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांनी आपल्या रुग्णांना रेमिडेसिव्हर औषध उपलब्ध करून द्यावे.

उपचारासाठी किमान 15 दिवसाचा साठा उपलब्ध करावा. असे या बैठकीत ठरवण्यात आले. याचे आदेश आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व खासगी दवाखान्यांच्या व्यवस्थापनांना दिले आहेत. तातडीने याची अंमलबजावणी करावी असेही सांगण्यात आले आहे. या आदेशामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी तारांबळ थांबणार आहे. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com