कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्या दुप्पट करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्याचा ‘शुन्य पॉझिटीव्हिटी रेट’ करण्यासाठी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे
कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्या दुप्पट करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील (kolhapur district) पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण (corona patients) अधिक संख्येने आहेत. या तालुक्यातील रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या अधिक जाणवते तरीही अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नाउमेद न होता या तालुक्यांसमवेत जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई (collector daulat desai) यांनी दिले.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच कोल्हापुरात आढावा बैठक घेतली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज व्ही.सी व्दारे जिल्ह्यातील प्रांतधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, न. प. चे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक राजर्षी शाहूजी सभागृहत घेतली यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्या दुप्पट करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
2 कोटीहून अधिकचा गंडा; बालिंगातील संशयित सराफास अटक

गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रशासनाकडून कोरोना अटकावासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असूनही केवळ सूक्ष्म नियोजनाअभावी रुग्ण संख्या वाढते आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. ते म्हणाले, जिल्ह्यात आपण प्रतिदिनी सुमारे 10 हजारच्या आसपास टेस्टींग करतो. संबंधितांनी हे प्रमाण दुप्पट करावे, म्हणजेच दिवसाला किमान 20 हजार टेस्टींग (testing) करण्यात याव्यात. जिल्ह्याचा ‘शुन्य पॉझिटीव्हिटी रेट’ आणण्यासाठी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, तहसिलदार, बी. डी. ओ, न. पा. मुख्याधिकारी यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे. त्याचबरोबर हायरिस्क पेशंट तपासणी बाबत व्यापक मोहिम राबवण्यात यावी व त्याची सुरुवात ग्रामपंचायती पासून करण्यात यावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) मनिषा देसाई यांनी जिल्हातील संपूर्ण तालुक्यांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आढावा सादर केला. या आढावा बैठकीसाठी प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी (जि. प) अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, उपजिल्हाधिकारी सर्वश्री हेमंत निकम, भगवान कांबळे, कॅफो (जि.प) राहूल कदम, डॉ. हर्षदा वेदक उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्या दुप्पट करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोल्हापूर : मराठा मुक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com