esakal | 2 कोटीहून अधिकचा गंडा; बालिंगातील संशयित सराफास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

2 कोटीहून अधिकचा गंडा; बालिंगातील संशयित सराफास अटक

2 कोटीहून अधिकचा गंडा; बालिंगातील संशयित सराफास अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : चांगला परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणुकदारांना (investers) दोन कोटी नऊ लाखांहून अधिकचा गंडा घातल्या प्रकरणी बालिंगातील संशयित सराफास करवीर पोलिसांनी (karavir police)अटक केली. सतिश ऊर्फ संदीप सखाराम पोवाळकर (वय ३४, सध्या रा. कणेरकरनगर) असे त्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सतिश ऊर्फ संदीप पोवाळकर हा मूळचा दोनवडे (ता. करवीर) येथील आहे. त्याचे बालिंगा (ता. करवीर) येथे अंबिका ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात त्याने सुवर्णठेव योजना सुरू करून गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे अमिष दाखवले. (crimecase) सुरवातीला चांगला परतावाही दिला. तसे त्याच्याकडे बालिंगा, नागदेववाडी, लक्षतीर्थ वसाहत आदींसह मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली. अनेकांनी सोन्याचे दागिनेही त्याच्याकडे ठेवले. त्याने गेल्या दहा वर्षात गुंतवणुकदारांची दोन कोटी नऊ लाख ४० हजार ४९४ रूपयांचा अपहार केला. अशी फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात १७ एप्रिलला दाखल झाली. त्यानुसार संशयित सतिश ऊर्फ संदीप पोवाळकर व त्याचा नातेवाईक अमोल पोवार या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा: आंबोलीतील दरीत तरुणीची उडी

गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश व अमोल हे दोघेही पसार झाले होते. दरम्यान सतिश हा अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या तयारीत असून तो कसबा वाबड्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयाने १८ जून पर्यंत कोठडी सुनावली. त्याला अटक झाल्याची माहिती कळताच गुंतवणुकदारांनी करवीर पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. त्याच्याविरोधात आणखी तक्रारी वाढण्याची शक्यता असून फसवणुकीची व्याप्तीही आणखी मोठी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.

loading image