esakal | इचलकरंजी IGM रुग्णालयातील हायफ्लो मशीनला आग
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी IGM रुग्णालयातील हायफ्लो मशीनला आग

इचलकरंजी IGM रुग्णालयातील हायफ्लो मशीनला आग

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयात (IGM hospital) हायफ्लो मशीनला अचानकपणे आग लागली. या घटनेत हायफ्लो मशीन (highflow machine) जळून खाक झाले. या माशीनवरील उपचार सुरू असणाऱ्या बाधित रुग्णाला त्वरित जम्बो सिलिंडरच्या साहाय्याने ऑक्सिजन (oxygen) देऊन सुखरूप स्थळी हलवले. दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली. या मशीनच्या जळण्याने संपूर्ण आयसीयू युनिटमध्ये (ICU unit) धुराचे लोट पसरले होते. सुरक्षारक्षक व परिचारिका यांच्या प्रयत्नांमुळे आयसीयू युनिट पूर्वस्थितीत आणले. मात्र या घटनेने आयजीएम रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले होते.

कोरोनाच्या (covid-19) भयावह कालावधीत मंगळवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयजीएम रुग्णालयामध्ये आग लागण्याची घटना घडली. आयसीयूमधील बाधित रुग्णावर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या हायफ्लो मशीनला आग लागली. हे मशीन जागीच जळून खाक झाले. अग्निरोधकाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्वरित रुग्णावर अन्य सिलेंडरच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा देण्यात आला. मशीन जाळून धुराचे लोट आयसीयूमध्ये पसरले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी विद्युत कर्मचारी दाखल झाले असून विद्युत जोडणीची तपासणी सुरू आहे.

हेही वाचा: खळबळजनक! स्वॅब तपासणीची दोन यंत्रे बंदच, स्वॅबची तपासणी परजिल्ह्यातून