esakal | कोल्हापुरात कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

कोल्हापुरात कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर : तब्बल आठ ते दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूर (kolhapur) शहरात आज कोविशिल्डचा दुसरा (covishield vaccine) डोस उपलब्ध झाला आहे. शहरातील 11 लसीकरण केंद्रावर उपलब्ध झाल्यामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर (vaccination centre) नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले असले तरीही ज्यांना डोस घेऊन जास्त दिवस झाले आहेत, त्यांना दुसरा डोस देताना प्रथम प्राधान्य देण्यात आले. तशा पद्धतीची एक यादी सर्व लसीकरण केंद्रावर लावण्यात आली होती. तसेच बहुतांशी लोकांना लस घेण्यासंदर्भात महापालिकेतून संपर्क साधला होता.

हेही वाचा: यंदा जादा पाऊस होणार असला, तरी महापूर राहणार नियंत्रणात!

ज्या नागरिकांचा कोविशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसापेक्षा अधिक दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना पहिला डोस घेतलेल्या दिवसांपासून उतरत्या क्रमाने म्हणजेच उदाहणार्थ ज्यांना ११० दिवस झाले आहेत त्यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. त्यानंतर उतरत्या क्रमाने ८४ दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले आहे. अशा याद्या त्या त्या संबधित आरोग्य केंद्रावर लावण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना संबधित आरोग्य केंद्रावरून फोन कॉल येतील त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून लस घ्यायची आहे. सर्व पात्र नागरिकांना दुसरा डोस वेळेत देण्याचा प्रयत्न आहे.

loading image