

CPR Corruption Allegations
sakal
कोल्हापूर : सीपीआरमधील वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय पवार यांनी केला होता. आज त्यांनी या भ्रष्टाचाराचा हिशेब लिहिलेली बहुचर्चित ‘फाईल क्रमांक ३’ नावाची वही तपास समितीचे प्रमुख डॉ. दिलीप माने यांना दिली. ‘तपास पारदर्शक करून दोषींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.