CPR Hospital : उपचारात हयगय झाल्यास कारवाई; डॉ. प्रदीप दीक्षित

रुग्णांना तातडीने ॲडमिट करून घ्या, हलगर्जीपणाची चौकशी करू
CPR-Hospital
CPR-Hospitalsakal media

कोल्हापूर : सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्णांची काळजी घ्या, त्यांच्या लक्षणानुसार त्यांना तातडीने ॲडमिट करून घ्या, गरजेनुसार उपचार तातडीने करा, अशा सूचना सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासोबत उपचारात हलगर्जीपणा झालेल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करू, कॅटीन सेवेची तातडीने माहिती घेऊ, हृदयशस्त्रक्रिया विभागातील बॅटऱ्या बदलण्यात येत आहेत. तेथील तांत्रिक अडचणी दूर केली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

कोरोनाकाळात सीपीआरच्या सर्व डॉक्टरांनी वैद्यकीय यंत्रणेने चांगले काम केले, मात्र कोरोना संपल्यानंतर नियमित उपचार सेवेत विविध उणिवा तसेच तांत्रिक अडचणी होत्या. त्यावरून रुग्णांची हेळसांड झाल्याचे प्रकार घडले व याची दखल घेत ‘सकाळ’मधून वृत्तमालिका प्रसिद्ध झाली. याची दखल घेतली असून वृत्तमालेतील उल्लेख केलेल्या सर्व घटनांची चौकशी करण्यात येईल, चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अधिष्‍ठाता डॉ. दीक्षित यांनी दिली. अपघात विभागातील रुग्णांवर उपचारासाठी मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांकडून विलंब झाला. त्यात एका रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांची चौकशी सुरू केली आहे.

काही डॉक्टर सिंधुदुर्गला गेले होते. ते परत आले आहेत. याची चौकशी पूर्ण होईल, असे प्रकार घडू नयेत. ॲडमिट रुग्णांवर त्या त्या विभागाच्या प्रमुखांनी तसेच सहयोगी प्राध्यापकांनी वेळीच उपचार केले, की नाही, हे स्वतः यापुढेही मी पाहणार आहे. जिथे उपचारात हयगय दिसल्यास त्यासंबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

कोरोनाकाळात सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्णांना कोरोनासोबत अन्य गंभीर व्याधी असतानाही त्यातील मोजक्याच रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत लाभ दिला. यातून सीपीआरचे आर्थिक नुकसान झाले. ही बाब मान्य असली तरी शासनाकडून आदेशाची अंमलबजावणी करावी लागते. तांत्रिक अडचणीतून प्रकार घडला आहे. त्याची माहिती घेऊन सुधारणा करण्यात येतील, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com