कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी कोणाला-किती रक्कम दिली, या भ्रष्ट व्यवहारांची ‘लाल’ वही समोर आली आहे. .जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याकडे ही वही सापडली असून, त्यात लाल-निळ्या अक्षरात ‘सरांना पाच लाख’, ‘मॅडमना सात लाख’ अशी उघड -उघड नोंद केली आहे. सरकारी खजिन्यातून येणाऱ्या पैशांची उघडी लूट, बिलांवर सही करण्यासाठी पैशांचे खुले व्यवहार आणि भ्रष्टाचाराचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचे हा ठोस पुरावा देणाऱ्या या वहीतील ‘सरांचा’ आणि ‘मॅडम’चा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे मोठे आव्हान आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर आहे. .Kolhapur CPR Scam : सीपीआरमध्ये शिवसेनेचे स्टिंग ऑपरेशन; उघड झाले वैद्यकीय बिलांच्या लाखो रुपयांच्या व्यवहारांचे गुप्त हिशेब.सीपीआरमधील वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी कोणला किती रुपये दिले, याची वही समोर आल्यानंतर सीपीआरमधील ‘खाबूगिरी’ व ‘डिल’ करणाऱ्या मंडळींचा पर्दाफाश जवळ आला आहे. हे सर कोण आणि ही मॅडम कोण? सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांच्या मंजुरीवरून लाखो रुपये गिळणारे हे दोघे मोठे कोण आहेत? .त्यांच्यासाठी पैसे कोण गोळा करत होते? ही रक्कम कोणाकडे पोहोचत होती? कोणाच्या शब्दाने कोणती फाईल पुढे ढकलली जात होती? या प्रत्येक प्रश्नामागे भ्रष्टाचाराचा डोंगर दडलेला दिसत आहे. सीपीआरमधील असे अनेक प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. .Kolhapur CPR scam : अधिकृत बंद, अनधिकृत सुरूच!’ सीपीआरमधील ५–६% वसुलीचा पर्दाफाश; स्टिंग ऑपरेशनने दाखवले भ्रष्टाचाराचे रजिस्टर.मात्र, आतापर्यंत झाले काय? आरोपी कर्मचाऱ्याला काही वरवरची सुनावणी आणि नंतर पुन्हा त्याच गोटाला संरक्षण? जर असेच झाले, तर ही लाल वही पुढील काही दिवसांत नष्ट होईल. कारण, आतापर्यंत अशा अनेक फाईली, कागदपत्रे गायब झाल्याची उदाहरणे कोल्हापूरच्या आरोग्य यंत्रणेत कमी नाहीत. .चुकीच्या पद्धतीची रक्कमही सरांना आणि मॅडमना देण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे केले जात आहे. हे व्यवहार एखाद्या खासगी दलालाच्या किंवा ठेकेदाराच्या वहित असते, तरी धक्का कमी बसला असता..पण, ही वही सरकारी कार्यालयातील अधिकृत कामकाजाशी जोडलेल्या व्यक्तीकडे आढळली, हा सर्वात गंभीर मुद्दा आहे. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बिलांवरून पैसे घेणे हे ‘नियमित कामकाजाचा’ भाग बनवले गेले आहे का, हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. वैद्यकीय बिलांचे रॅकेट नव्याने उघड झालेले नाही. जिल्ह्यातील विविध कार्यालयांतून बिलांवर सही मिळवण्यासाठी काही ‘विशेष चॅनेल’ वापरले जात असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून आहे..थेट जबाबदारी निश्चितीची गरजया प्रकरणात वही सापडलेला कर्मचारी तत्काळ निलंबित करणे ही पहिली जबाबदारी आहे. त्याची चौकशी विभागीय पातळीवर नव्हे, तर स्वतंत्र पथकाने करावी. कारण, विभागीय अधिकारीच या भ्रष्ट साखळीचा भाग असतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. .त्यानंतर या वहीतील नोंदी कोणाच्या हस्ताक्षरात आहेत याची फॉरेन्सिक चौकशी करावी. मोबाइल चॅट्स, कॉल रेकॉर्ड, बँक व्यवहार, युपीआय पेमेंट्स या सर्व दुव्यांची तपासणी केल्यास या ‘सरां’पर्यंत आणि ‘मॅडम’पर्यंत पोहोचणे काही कठीण नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.