कोल्हापूर : सीपीआरमध्ये नव्याने सुरू झालेल्या एमआरआय व सीटीस्कॅन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जात आहे. महिन्यात २१७ रुग्णांनी एमआरआय आणि १२८ रुग्णांनी सिटीस्कॅन करून घेतले. .अवघ्या दोन हजार रुपयांत एमआरआय आणि ३५० रुपयांत सिटीस्कॅन होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. चाचणीसोबतच पुढील उपचार एकाच छताखाली असल्याने उपचार प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे..Kolhapur CPR Hospital : ‘सीपीआर’मधील डायरी प्रकरण गंभीर; दोषींवर कारवाई करण्याची आरोग्यमंत्र्यांची ग्वाही.सीपीआरमध्ये कोल्हापूरसह पाचही जिल्ह्यांतील गंभीर व अतिगंभीर रुग्ण उपचारासाठी येतात. जखमी, गंभीर आजारांनी पीडित किंवा मेंदू, मणक्याच्या तीव्र वेदनांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना एमआरआय चाचणी अत्यंत आवश्यक असते. .वर्षानुवर्षे सीपीआरमध्ये ही सुविधा नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात एमआरआय करून पुन्हा सीपीआरमध्ये यावे लागत होते. यामुळे वेळ, पैसा आणि मनस्तापही मोठ्या प्रमाणात होत होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच सीपीआर भेटीत एमआरआय सुविधा देण्याची घोषणा केली होती..जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासह ''हब-एंड-स्पोक'' धोरण लागू करा.त्यासाठी मंजुरीपासून मशीन बसवण्यापर्यंत पाठपुरावा करात दोन नव्या सुविधा उभ्या केल्या आहेत. १७ नोव्हेंबरपासून एमआरआय, तर ३ नोव्हेंबरपासून नव्या सिटीस्कॅन मशीनचा वापर सुरू झाला. दिवसाला दोन ते पाच रुग्ण व अपघातग्रस्तांची एमआरआय चाचणी होत आहे. .तत्काळ अहवाल मिळू लागल्याने उपचारांची दिशा ठरविणे, आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियेचा निर्णयही तातडीने घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांवरील उपचार अधिक सक्षमतेने करता येणार आहेत..सीपीआरमध्ये एमआरआय व सीटीस्कॅन सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. वेळेत निदान, तातडीचे निर्णय आणि सक्षम उपचार देण्यासाठी आवश्यक नियोजन केले आहे. त्यामुळे बहुतेक सर्व उपचार सीपीआरमध्येच होऊ शकतील. या सेवांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे- डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय‘सकाळ’चा पाठपुरावा.सीपीआरमध्ये एमआरआय सुविधा नसल्याने रुग्ण व जखमींची गैरसोय होत होती. दुर्बल घटकांतील रुग्णांना खासगी रुग्णालयात पैसे खर्च करून एमआरआय चाचणी करून घेणे कठीण जात होते. याची दाखल घेत सीपीआरमध्ये एमआरआय मशीन बसविण्याबाबत ‘सकाळ’मधून पाठपुरावा केला होता. त्यामुळे नवी सुविधा होण्यास मदत झाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.