सासने मैदान हॉलची दुरवस्था

बॅडमिंटन कोर्टच्या सिंथेटिक सरफेसला तडे ; तीनशेवर खेळाडूंचे भवितव्य टांगणीला
Badminton court
Badminton courtsakal
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना स्पर्धेविना राहावे राहण्याची स्थिती झाली आहे. आधी कोरोना, मग भाडेवाढ आणि आता बॅडमिंटन कोर्टचे उखडलेले सिंथेटिक सरफेसमुळे स्पर्धा सोडाच, सराव देखील जीव मुठीत घेऊन केला जात आहे.  जिल्ह्यात होणाऱ्या महत्त्वाच्या बॅडमिंटन स्पर्धा या परिस्थितीमुळे अजूनही लॉकडाऊनच आहेत.  जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक खेळाडूंचे  भवितव्य टांगणीला लागले आहे.

जिल्हा स्पर्धा आणि राज्य स्पर्धा अनिश्चित असल्यामुळे खेळाडूंची पुढची वाट खडतर बनली आहे. त्यातच ऐन हंगाम निघून जात असल्यामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान होणार आहे. यामुळे जिल्हाभरामध्ये खेळणाऱ्या ५०० हून अधिक खेळाडू तर स्पर्धात्मक पातळीवर खेळणाऱ्या ३०० खेळडूंचे भवितव्य अंधकारमय बनले आहे.

परवानगीमुळे सध्या शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांवर सराव सुरू झाला आहे. असे असले तरीही स्पर्धा होऊ शकणारे सासने मैदानावरील बॅडमिंटन कोर्ट मात्र खराब झाले आहे. शहरातील सिंथेटिक कोर्ट असल्यामुळे याठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जात होते. महापालिकेतर्फे काही महिन्यांत कोर्टसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. एकीकडे शुल्क वाढवूनसुद्धा या कोर्टच्या डागडुजीकडे मात्र दुर्लक्ष केले गेले आहे.

अनेक स्पर्धा अनिश्‍चित

कोल्हापूर हे बॅडमिंटन खेळासाठी पोषक समजले जाते. येथे वर्षभरात विविध स्पर्धा होतात. मात्र, सर्वाधिक महत्त्वाची असणाऱ्या जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आयोजित जिल्हा स्पर्धा आणि सेव्हन मॉर्निंग ग्रुपची राज्य स्पर्धा या परिस्थितीमुळे अनिश्चित आहेत. या स्पर्धांमुळे खेळाडूंचे रँकिंग वाढण्यास मदत होत असून याचा फायदा पुढे राष्ट्रीय स्पर्धांत होतो.

जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंसाठी स्पर्धेचे ठिकाण म्हणून सासने मैदानावरील बॅडमिंटन हॉल उपयुक्त ठरत आहे. मात्र, सद्य:स्थितीत येथे स्पर्धा खेळवणे अशक्यच आहे. स्पर्धांसाठी मैदानच उपलब्ध नसल्याने खेळाडूंना अन्य जिल्ह्यांतील स्पर्धांवर अवलंबून राहावे लागत आहे

- मिलिंद आपटे, बॅडमिंटन प्रशिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Union election voter list 2026
Kolhapur Wrestler Death pattankodoli
Why is Kolhapur water pumping banned?
Falling River Levels Trigger Water Scarcity Fears Across Kolhapur District
Marathi News Esakal
www.esakal.com