शिवाजी पेठेतील छोट्या गल्लीपासून सुरु झालेला सचिन वाझेंचा प्रवास; वाचा सविस्तर

Cricketer to Encounter Specialist Sachin Vaze police marathi news
Cricketer to Encounter Specialist Sachin Vaze police marathi news

कोल्हापूर: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या  "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कार्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना काल अटक करण्यात आली.  सुमारे 10 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. सध्या सोशल मीडिया वरती सचिन वाझे हाच एक विषय फिरत आहे. सचिन वाझे आहेत कोण ते कोठे राहतात जाणून घेऊया.

 कोल्हापूरमधील शिवाजी पेठेतील छोट्या छोट्या गल्लीमध्ये सचिन यांचे घर आहे. सचिन हे क्रिकेटर आहेत. शिवाजी विद्यापीठाचे मैदान किंवा जिमखाण्यावर ते नेहमी सराव करत होते. सुनील गावस्कर हा त्यांचा आवडता खेळाडू. मराठा बोर्डींग कडून ते  क्रिकेट खेळायचे. स्वतः ते  विकेट किपर आहेत. त्यांचा भाऊ हे क्रिकेटमध्ये एक्सपर्ट आहे.

सचिन यांचे मित्र जनार्दन यादव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, सचिन हे मितभाषी आहेत. त्यांच्या अंगात काहीतरी नविन करण्याची उर्मी आहे. आपण काहीतरी वेगळं करायचं हा त्यांचा ध्यास असायचा. त्यांचे आई-वडील, त्यांचा भाऊ सुधर्म हे कुटुंब अत्यंत इन्स्पायरिंग आहे.त्यांचा क्रिकेटर ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट हा प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने 1990 नंतरच. 

1990 नंतर सचिन वाझे यांचे असे बदलले विश्व

सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून १९९० ला ते गडचिरोलीला रुजू झाले. त्यानंतर त्यांची ठाण्यात बदली झाली. त्यानंतर सचिनने परत पाठीमागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी आपल्या कुटुंबाशी संपर्क तोडून दिला. एवढेच नाही तर त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कार देखील हजर नव्हते. क्रिकेटप्रेमी असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार ही मोठा होता. मात्र ते कोल्हापूरला परत आलेच नाही.

2004 नंतर नेमके काय झाले

2004 पर्यंत संगळे काही सुरळीत होते. त्यानंतर मात्र घाटकोपर बॉम्बस्फोटांमध्ये संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाझे गोत्यात आले.  आणि फेक एन्काऊंटर प्रकरणी 2008 साली त्यांना निलंबित करण्यात आले. पोलीस खात्यातून निलंबित झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत  त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र राजकारणात कधी रमले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी चीन मधल्या काही कंपन्यांशी करार करून इम्पोर्ट एक्सपोर्ट चा बिझनेस सुरू केला. सर्वकाही सुरळीत सुरू असताना वाझे यांच्या आयुष्याने  वेगळाच टर्न घेतला. महाविकासआघाडी सत्तेत आल्यानंतर वाझे यांना पुन्हा एकदा पोलीस दलात रुजू करून घेण्यात आले.

असे ही वझे

क्राईम इंटेलिजन्स युनिट या प्रमुख पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले.  पदावर रुजू होताच अन्वय नाईक या आत्महत्या प्रकरणाची झाडाझडती सुरू केली. त्यानंतर टीआरपी घोटाळाप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना घरात  अटक केली. दिलीप छाबळे यांच्या स्पोर्ट्स कार्ड घोटाळा प्रकरणाचा  उलगडा केला. वाझे यांची धडाकेबाज कारवाई सुरू असतानाच स्फोटकांनी भरलेल्या कारचे  प्रकरण समोर आले आणि वाझेंना अटक झाली. वीस वर्षाच्या कालखंडामध्ये 26 /11 च्या हल्ल्यात वरती "जिंकून हरलेली लढाई" असे  एक पुस्तक लिहिले आहे. आता  सचिन एका या प्रकरणात अडकले आहेत. या प्रकरणातून ते कसे सुटतात की अडकतात हेच पाहावे लागेल.

संपादन- अर्चना बनगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com