esakal | कसबा तारळेतील नऊ जणांवर गुन्हा : बाळूमामांच्या पालखीत सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांना फाटा

बोलून बातमी शोधा

Crime against nine persons in Kasba Tarle crime marathi news

सोशल डिस्टंसिंग आणि मास्कच्या वापराविना बाळूमामांची पालखी मिरवणूक 

कसबा तारळेतील नऊ जणांवर गुन्हा : बाळूमामांच्या पालखीत सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांना फाटा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कसबा तारळे (कोल्हापूर) : येथे बाळूमामांच्या पालखी दरम्यान विनापरवाना  डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधासाठीच्या सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांना फाटा दिल्याने नऊ जणांसह अज्ञात ५० ते ६० जणांवर राधानगरी पोलिसांत आज गुन्हा दाखल झाला.


याबाबत राधानगरी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी: 
गेले महिनाभर राधानगरी तालुक्यातील गावागावांमधून बकऱ्यांसह फिरत असलेली बाळूमामांची पालखी कसबा तारळे येथे आली होती.  पालखीच्या स्वागतासाठी डॉल्बी लावून मिरवणूक निघाली. यावेळी  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानाही सोशल डिस्टंसिंग कोणीही पाळले नाही आणि मास्कचा वापरही केला नाही.या कारणांमुळे राधानगरी पोलिसांनी स्थानिक नऊ जणांसह अज्ञात ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला. या नऊ जणांपैकी बहुतांशी हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत.

हेही वाचा- संभाजी भिडे गुरुजींनी आमदाराला काढायला लावला मास्क पाहा व्हिडीओ

पोलिस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली ए.के.कांबळे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, कसबा तारळेहून ही पालखी जवळच्याच कुकूडवाडी गावांमध्ये दाखल झाली असून तारळे खुर्द ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत ग्रामस्थांना कोरोना कालावधीत नियमांचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्यास कळविले आहे.

संपादन- अर्चना बनगे