esakal | लग्नघरात शोककळा; वीजेचा शॉक लागून भावाचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

लग्नघरात शोककळा; वीजेचा शॉक लागून भावाचा मृत्यू
लग्नघरात शोककळा; वीजेचा शॉक लागून भावाचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : बहिणीच्या लग्नाची तयारी करत असताना तरुणाचा वीजवाहिनीचा धक्का बसून मृत्यू झाला. भरत रमयलाल केसरवाणी (वय २६, मुरदंडे मळा) असे त्याचे नाव आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयातून आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील पुजारी मळा परिसरात भरत केसरवाणी कुटुंबासमवेत राहतो. त्याच्या बहिणीचा विवाह शनिवारी (३०) होणार होता. घरात लगीनघाई सुरू होती. भरत दुसऱ्या मजल्यावर साफसफाईचे काम करत होता. यावेळी गच्चीवरील लोखंडी लांबलचक सळी बाहेर काढताना घराजवळून गेलेल्या अति उच्चदाब वाहिनीला स्पर्श झाला. विजेच्या धक्‍क्‍याने तो जागीच आदळला. याची माहिती नातेवाईकांना समजली. त्यांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. रमयलाल केसरवाणी (वय ५४, रा. मुरदंडे मळा) यांनी वर्दी दिली. दोन दिवसांवर विवाह सोहळ्यासाठी घरात आनंदाचे वातावरण होते. त्याचवेळी भरत याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे केसरवानी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: Video - कोरोनामुक्तीसाठी प्लाझ्मादान गरजेचे; दानशूरांची संख्या कमी